लांब आणि काळे केस हवेत? मग 'हा' टेस्टी ज्यूस प्यायलाच हवा

Suraj Sakunde

आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हा परिणाम चेहरा तसेच केसांवरसुद्धा दिसून येतो.

केसांच्या समस्यांमुळं जवळपास प्रत्येक व्यक्ती त्रस्त असतो, त्यापासून सुटकेसाठी विविध उपाय अवलंबले जातात.

आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

आज आपण एका आरोग्यदायी आणि चविष्ट अशा ज्यूसबद्दल माहिती घेणार आहोत, जो केसांसाठी लाभदायी आहे.

या ज्यूससाठी आवळा, कडीपत्ता आणि काकडी थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

तुमचा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस तयार होईल. हा ज्यूस तुम्ही दररोज किंवा एक दिवसाआड पिऊ शकता.

या ज्यूसमध्ये असणाऱ्या तीन गोष्टी शरीरासोबतच केसांसाठीही फायदेशीर असतात.

या ज्यूसचं सेवन केसांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळं हेअर ग्रोथ चांगली होते.