घराच्या समृद्धीसाठी उपयुक्त आहेत 'वनस्पती'

नेहा जाधव - तांबे

लीलीच्या फुलांचा सुवास घरभर पसरतो. त्यामुळे मनःशांती वाढते आणि तणाव कमी होतो. चमेलीचे रोप नेहमी खिडकीजवळ ठेवावे. | Photo - Canva
गणपतीचे आवडते फूल जास्वंद. हे त्वचा आणि केसासाठी उपयुक्त आहेच पण वास्तूसाठीही उपयुक्त आहे. जास्वंद घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. | Photo - Canva
नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी स्नेक प्लांट उत्तम. घरातील नकारात्मक प्रभाव कमी करतो. हे विशेषतः साउथ-ईस्ट कोपऱ्यात ठेवावे. | Photo - Canva
बांबू सौभाग्य व धन प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक आहे. ते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. विशेषतः ते पूर्व आणि साउथ-ईस्ट दिशेला ठेवावे. | Photo - Canva
आध्यात्मिक व औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण वनस्पती. घरात तुळस ठेवल्याने आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. घरात तुळस नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी. | Photo - Canva
वडाचे रोपटे हे भरभराट आणि संपत्ती वाढवणारे आहे. त्यासोबतच हे झाड आपल्याला मनःशांती देते. उत्तर दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. | Photo - Canva
केळी ही वनस्पती वास्तुसाठी शुभ मनाली जाते. मंगल प्रसंगी त्याला प्रथम स्थान दिले जाते. घराच्या भरभराटीसाठी केळीची वनस्पती नेहमी उत्तरपूर्व किंवा पूर्व कोपऱ्यात ठेवणे सर्वोत्तम. | Photo - Canva