सावधान! 'या' १० सवयींमुळं होऊ शकतो मुतखडा...

Suraj Sakunde

मुतखडा ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे. जर तुम्हाला या आजाराची लक्षणं माहीत असतील, तर तुम्हाला वेळेत उपचार घेता येऊ शकतात.

मुतखडा होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या १० गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला यापूर्वी मुतखडा झाला असेल, तर इतरांच्या तुलनेत मुतखडा होण्याचा धोका अधिक असतो.

सामान्य लोकांच्या तुलनेत लठ्ठ लोकांमध्ये यूरिन जास्त आम्लयुक्त असतं. त्यामुळं युरिक अॅसिड आणि कॅल्शियम अधिक उत्सर्जित होतं. त्यामुळं किडनी स्टोन होऊ शकतो.

डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये युरिक अॅसिड जास्त आढळतं. ज्यामुळं मुतखडा होण्याचा धोका अधिक असतो.

डिहायड्रेशची समस्या असल्यास शरीरात युरिन कमी प्रमाणात तयार होतं, त्यामुळं लघवीमधील क्षार क्रिस्टलच्या रुपात एकत्र होतात आणि स्टोन तयार होतो.

जंकफुडमध्ये साल्ट आणि कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. या दोन्ही गोष्टी किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरू शकतात.

हार्मोनल असंतुलनामुळं लघवीत कॅल्शियमचं उत्सर्जन वाढू लागतं, त्यामुळं किडनी स्टोन होण्याचा धोका निर्माण होतो.

सामान्य व्यक्तीच्या शरीरात ऑक्सलेट उत्सर्जन मार्गातून बाहेर निघून जातो. मात्र आतड्याच्या शस्त्रक्रिया झालेले लोकांमध्ये ही प्रक्रिया प्रभावित होते. त्यामुळं किडनी स्टोन होऊ शकतो.

यूटीआई पीडित व्यक्तींमध्ये लघवीमधील क्षार वाढते आणि किडनी स्टोन निर्माण होतो.

एखाद्या व्यक्तीला यूरिन ट्रॅक्टमध्ये शारीरिक किंवा संरचनात्मक असामान्यता असेल, तर लघवी कमी प्रमाणात होते. त्यामुळं क्षार किडनीमध्ये जमा होऊन मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.