लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने नुकताच सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
या फोटोंमध्ये भाग्यश्रीने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट हॉल्टर नेक कुर्ता आणि डेनिम जीन्स वेअर करत साधा पण स्टायलिश अंदाज दाखवला आहे.
नुकत्याच केलेल्या शॉर्ट हेअरकटमुळे तिच्या संपूर्ण लूकमध्ये फ्रेश आणि ग्लॅमरस टच पाहायला मिळत आहे.
मिनिमल मेकअप, हलके दागिने आणि नैसर्गिक एक्सप्रेशन्समुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
आउटडोअर लोकेशनमध्ये क्लिक केलेल्या या फोटोंमध्ये भाग्यश्रीचा सहज आणि कॉन्फिडंट अंदाज चाहत्यांना विशेष आवडला आहे.
फोटो शेअर करताना भाग्यश्रीने "Currently in pajamas, posting dressed up pictures!" असं हटके कॅप्शन देत चाहत्यांचंही लक्ष वेधलं.
तिच्या या नव्या लूकवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत असून, कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
साधेपणा, स्टाईल आणि नव्या हेअरस्टाईलचा सुंदर मिलाफ असलेला भाग्यश्रीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. | All Photos : Instagram | Bhagyashree Limaye