भूमी पेडणेकरचा स्टायलिश अंदाज; ४ लाखांच्या गाऊनने वेधलं साऱ्यांचं लक्ष
किशोरी घायवट-उबाळे
अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकत्याच मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात आपल्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्काय ब्लू रंगाच्या सुमारे ४.११ लाख किमतीच्या डिझायनर गाऊनमध्ये तिने रेड कार्पेटवर हजेरी लावत पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सची झलक दाखवली.
हॉल्टर नेक डिझाइन आणि सॉफ्ट ड्रेपिंगमुळे गाऊनला आधुनिक आणि आकर्षक लूक मिळाला.
गाऊनवरील चमकदार हँड बीडवर्कमुळे हा डिझायनर पोशाख आणखी खास ठरला.
गाऊनमधील हाय-थाय स्लिटमुळे संपूर्ण लूकला बोल्ड आणि ग्लॅमरस टच मिळाला.
भूमीने नाजूक कानातले, सॉफ्ट ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिप्ससह लूक पूर्ण केला.
एलिगंट अपडो हेअरस्टाइल आणि चेहऱ्याभोवतीच्या हलक्या बटांनी तिच्या संपूर्ण लूकमध्ये चारचाँद लावले.