Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच मिळणार स्पेशल बेड? यंदा काय आहे विशेष आकर्षण, पाहा Photo's

किशोरी घायवट-उबाळे

‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 च्या घराची पहिली झलक अखेर प्रेक्षकांसमोर आली आहे.
बिग बॉसच्या घरात यावेळी अनेक दरवाजे असून त्यावर अनोखी डिझाईन पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बिग बॉसच्या डोळ्याची डिझाईन केलेली आहे.
या घरात बाल्कनी, प्रशस्त लिव्हिंग रूम, किचन, वॉशरूम परिसर, बेडरूम, कॅप्टन रूम, गार्डन एरिया, जिम आणि स्विमिंग पूलसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.
घरातील डायनिंग एरिया अनोख्या डिझाईनने सजवण्यात आला असून तिथे असलेल्या मुखवट्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे.
वेगवेगळी रंगसंगती वापरुन साकारलेले बिग बॉसचे घर एखाद्या आलिशान रिसॉर्टइतकेच आकर्षक आहे.
बिग बॉसच्या घरातील किचन एरिया सर्व साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आला असून तिथे 'रेड अँड ग्रीन' थीमची डिझाईन करण्यात आली आहे.
यंदा घरात पहिल्यांदाच बंक बेड ही संकल्पना पाहायला मिळणार आहे.बिग बॉसच्या घरातील स्पेशल बेड खास आकर्षण ठरत असून बेड असलेली खोली रेड थीमने सजवण्यात आली आहे.
या बंक बेडमुळे स्पर्धकांमध्ये जागेवरून वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बंक बेड्समुळे बेडरूममध्ये काय चाललं आहे, हे प्रत्येकाला पाहता येणार आहे. घरात येताच बंक बेड कोण निवडणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.
घरातील नव्या प्रयोगांमुळे ‘बिग बॉस मराठी 6’ अधिक रंजक ठरणार यात शंका नाही. रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या शोचा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारीला रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.