Bobby Deol : दारूला रामराम! बॉबी देओल म्हणतो, 'दारू सोडल्यानंतर मी एक चांगला माणूस झालो'
Mayuri Gawade
अभिनेता बॉबी देओलने नुकत्याच एका मुलाखतीत उघड केलं की, त्यांनी दारू पिणं पूर्णपणे सोडलं आहे. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Bobby Deol)
त्याच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल ठरला आहे.
दारू सोडल्यापासून त्याला मनःशांती, स्पष्ट विचार आणि आत्मिक समाधान मिळालं आहे.
तो सांगतो, आता त्यांच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी असलेले नाते आणखी घट्ट झालं आहे.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला “दारू सोडल्यानंतर मी एक चांगला माणूस झालो आहे.
प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक रचना वेगळी असल्याने, व्यसनाची तीव्रता वेगळी असते, असं त्यांने स्पष्ट केलं.
काही लोकांना सवय लवकर लागते कारण त्यांच्या जीन्समध्येच (genes) तशी प्रवृत्ती असते, असं बॉबीने सांगितलं.
दारू सोडण्याचा निर्णय त्याने स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी घेतला.
तो म्हणाला, “स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि आपल्यासाठी काय योग्य आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.”