Bodybuilder Bride फोटो आणि व्हिडिओ व्हायरल; कोण आहे ही महिला? नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा

Kkhushi Niramish

नववधूच्या पारंपारिक वेशात तिने बायसेप्स (biceps - ६-पॅक अ‍ॅब्स) दाखवत फोटो आणि व्हिडिओ (Bodybuilder Bride) शेअर केले आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर इतके प्रचंड व्हायरल झाले आहे की जणून काही सोशल मीडियावर नेटिझन्सचे चक्रीवादळच आले की काय, असे वाटत आहे. कोण आहे ही जिने अनोख्या फोटोशूटमुळे नेटिझन्सला केले मोहित.
कर्नाटकातील Chitra Purushotham ही Bodybuilder म्हणून प्रसिद्ध आहे.
बॉडीबिल्डर चित्रा पुरुषोत्तम मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस आणि मिस साउथ इंडिया देखील राहिली आहे. याशिवाय तिने अन्य अनेक पुरस्कार जिंकले आहे.
या अनोख्या फोटोशूटमुळे तिने नववधूचा लूक कसा असावा याच्या पारंपारिक सौंदर्यशास्त्राला तिने थेट आव्हान दिले आहे. तर नेटकऱ्यांनी तिच्या या अनोख्या फोटोशूटला प्रचंड लाइक केले आहे. तिच्या या हटके फोटोंवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
चित्राचा लूक पाहून असे वाटत आहे जणू काही ती लग्नाच्या पोशाखातच रिंगमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. नेटकऱ्यांनी तशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तिने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड किरण राज याच्याशी लग्न केले आहे. माहितीनुसार, दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
चित्राच्या या अनोख्या लूकसोबत किरणचा सिंपल पोशाख चांगलाच सूट करत आहे. सोशल मीडियावर या अनोख्या फोटोशूटची मोठी चर्चा आहे.