उकडलेला की भाजलेला मका? पावसाळ्यात कोणता पर्याय ठरतो उत्तम
Mayuri Gawade
पावसाळ्यात गरमागरम मका खाण्याची मजाच वेगळी! चवीसोबत शरीराला अनेक पोषक घटकही मिळतात.
मका पोषक तत्वांनी भरलेला असतो! यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, बी६ आणि फॉलेट असतात.
पचनासाठी मका फायदेशीर ठरू शकतो! मक्यातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.
उकडलेला मका पचायला तुलनेने हलका असतो! त्यामुळे लहान मुलं आणि ज्यांचे दात कमकुवत आहेत त्यांच्यासाठी तो सोपा पर्याय ठरू शकतो.
उकडलेल्या मक्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते! त्यातील कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक घटक शरीराला आवश्यक ऊर्जा देतात.
भाजलेल्या मक्याची चव अधिक खमंग लागते! थेट आचेवर भाजल्यामुळे मक्याची नैसर्गिक चव अधिक उठून दिसते.
भाजलेला मका खाताना बटर आणि मीठ जपून वापरा! जास्त बटर किंवा मीठ घातल्यास त्याचा आरोग्यदायीपणा कमी होऊ शकतो.
चवीसाठी मक्यावर लिंबू पिळू शकता! जास्त मीठ किंवा बटर टाळून लिंबासोबत मका खाणं चांगला पर्याय ठरू शकतो.
उकडलेला की भाजलेला, दोन्ही प्रकारे मका खाऊ शकता! मात्र कमी मीठ आणि बटरसह भाजलेला मका अधिक हलका पर्याय ठरू शकतो. | All Photos :AI Generated