'सरायाह'...सिद्धार्थ-कियाराने बाळाचं नाव केलं जाहीर, वाचा लेकीच्या नावाचा खास अर्थ

Mayuri Gawade

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात लव्हेबल कपल्सपैकी एक मानले जातात. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम
सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या लेकीचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.
१५ जुलै रोजी जन्मलेल्या या गोंडस बाळचं नाव त्यांनी नुकतंच जाहीर केलं.
दोघांनी सोशल मीडियावर बाळाच्या पायाचा सुंदर फोटो शेअर करत आपल्या लेकीचं नाव सांगितलं.
‘आमचा दैवी आशीर्वाद, आमची राजकुमारी’ असं म्हणत त्यांनी तिचं नाव 'सरायाह मल्होत्रा' (Saraayah Malhotra) असल्याचं लिहिलं.
चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘सरायाह’ हा हिब्रू शब्द असून त्याचा अर्थ 'राजकन्या' असं मानलं जातं.
या अनोख्या नावामुळे सध्या सोशल मीडियावर सरायाहची चर्चा रंगली आहे.
‘वॉर २’चित्रपटामध्ये कियारा अखरेची दिसली होती, तर सिद्धार्थ सध्या 'वॅन' आणि 'रेव्ह ४' सारख्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
त्यांच्या आयुष्यात आलेल्या या छोट्या पाहुणीमुळे बी-टाउनमध्येही आनंदाचं वातावरण आहे.