चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग ब्रायडल मेकअप करताना घ्या 'ही' विशेष काळजी

Krantee V. Kale

प्रत्येक नवरीला लग्नाच्या दिवशी ग्लोइंग स्कीन आणि परफेक्ट मेकअप हवा असतो. | सर्व छायाचित्र : Yandex
ब्रायडल मेकअप करण्याआधी ट्रायल मेकअप नक्की करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणता फाउंडेशन शेड सूट होईल तसेच तुमचा लूक कसा दिसेल याची कल्पना मिळेल.
ब्रायडल मेकअपसाठी चांगल्या क्वालिटीचे आणि वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट्स वापरा.
प्रायमर चेहऱ्यावरील पोअर्स अस्पष्ट करुन स्मूद बेस तयार करतो. यामुळे नवरीचा मेकअप जास्त काळ टिकू शकतो म्हणून चांगल्या दर्जाचे प्रायमर वापरा.
मेकअप करताना सर्वप्रथम डोळ्यांचा मेकअप करा. यानंतर तुमचा बेस सेट करा.
मेकअप जास्त काळ टिकवण्यासाठी सेटिंग स्प्रे अत्यंत महत्वाचे आहे. मेकअपनंतर सेटिंग स्प्रे चेहऱ्यावर लावा.