Health Tips : ब्रोकोली खाण्याचे 'हे' महत्त्वाचे फायदे; आजपासूनच आहारात करा समावेश
किशोरी घायवट-उबाळे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असल्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत राहते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
हृदयासाठी फायदेशीर
ब्रोकोलीतील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे हृदय निरोगी राहते.
वजन कमी करण्यास मदत
कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे ब्रोकोली खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते.
पचनक्रिया सुधारते
ब्रोकोलीतील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करून पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
हाडे मजबूत बनवते
ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन K मुबलक असल्याने हाडांची ताकद वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
त्वचा आणि केसांसाठी उत्तम
व्हिटॅमिन A, C आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवतात तसेच केसांचे आरोग्य सुधारतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
ब्रोकोलीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी हा उत्तम भाजीपाला मानला जातो.
कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत
ब्रोकोलीमध्ये असलेले 'सल्फोराफेन'सारखे अँटिऑक्सिडंट्स पेशींचे संरक्षण करून काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. | vitanovski
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)