Budget 2026 : यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय? वाचा महत्त्वाची माहिती

किशोरी घायवट-उबाळे

प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे : उच्च शिक्षणासाठी ग्रामीण व गरजू मुलींना सुरक्षित निवासाची सुविधा. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
‘शी मार्ट्स’ (She MARTS Scheme) योजना जाहीर : स्थानिक उत्पादनांना SHE-Marts च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना स्वतःची दुकाने किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
'लखपती दीदी’ अभियानाला गती: महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नव्या उपाययोजनांचा विस्तार होणार. या योजनेअंतर्गत बचत गटांशी संबंधित महिलांना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यास मदत केली जाते.
मत्स्य व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
SHE-Mart अंतर्गत ग्रामीण भागात महिलांकडून चालवले जाणारे स्टोअर्स सुरू केले जातील.
यामुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होऊन भांडवलही मिळेल.
ग्रामीण महिलांसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष : रांचीसारख्या दुर्लक्षित भागांत स्वतंत्र मानसिक आरोग्य संस्था स्थापन होणार अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.