कॅन्सरला दूर ठेवायचंय? मग आजच स्वीकारा 'या' आरोग्यदायी सवयी

Krantee V. Kale

कॅन्सर हा एक प्राणघातक आजार आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. | All Photos- yandex
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अधिकाधिक लोक कॅन्सरला बळी पडत आहेत.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या चांगल्या सवयी अंगीकारुन तुम्ही कॅन्सरला दूर ठेवू शकता.
झोपेचा अभाव अनेकदा कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतो. यासाठी, दररोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घेतली पाहिजे.
दैनंदिन दिनचर्येत शारीरिक हालचाली होणे महत्वाचे आहे. यासाठी दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करा. तुम्ही वॉक, योगा आणि जॉगिंग यासारख्या गोष्टी करू शकता.
कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी, निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे. आहारात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्सने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते तेव्हा आपण सहज आजारी पडतो म्हणून रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे.यासाठी तुम्ही व्हिटॅमिन 'सी'ने समृद्ध असलेले पदार्थ खाऊ शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव सामान्य आहे. परंतु, ताणतणावामुळे कॅन्सरसह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, ताण कमी करण्यासाठी ध्यान करा.
कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी कोणत्याही पदार्थांचे सेवन करताना मर्यादित प्रमाणात खा. तसेच, शरीरात कोणतेही बदल दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
येथे दिलेले आरोग्यदायी सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित असून नवशक्ती याची पुष्टी करत नाही.