उन्हाळ्यातही तुमचे ओठ फाटत आहेत? 'अशी' घ्या काळजी

Kkhushi Niramish

उन्हाळ्यातही तुम्हाला ओठ फाटण्याची समस्या जाणवत आहे का? जाणून घ्या उन्हाळ्यात कोणत्या कारणांमुळे ओठ फाटण्याची समस्या निर्माण होऊ शकते. | All Photo Freepik
उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे काही जणांना ओठ फाटण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.
तसेच तुम्हाला एखादी ॲलर्जी असेल किंवा सातत्याने औषधे खात असाल तर त्याची रिॲक्शन देखील होऊ शकते. याशिवाय जीवनसत्त्व ब २, ब ६, ब ९ आणि ब १२ यांच्या कमतरतेमुळेही ओठ फाटण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
खोबऱ्याचे तेल हे यावर उत्तम उपाय ठरू शकते. रात्री झोपताना खोबऱ्याच्या तेलने दररोज ओठांना हलक्या हाताने मसाज करा.
खोबऱ्याच्या तेलाप्रमाणेच बदामाचे तेलदेखील ओठांना पुन्हा मऊ बनवण्यासाठी उत्तम असते.
दुधावरील ताजी साय आणि त्यामध्ये केसर टाकून याच्या मिश्रणाने ओठांवर मालीश केल्यास फाटलेले ओठ पुन्हा पूर्ववत होतील. सोबतच ओठांचा काळपटपणाही कमी होईल.
तुम्ही पेट्रोलियम जेली देखील ओठांना लावू शकता. हे तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने लावू शकता.
ओठांची नीट काळजी घेतल्यास ओठ फाटण्याची समस्या निर्माण होत नाही. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)