मनमोहक हास्य अन् गुलाबी रंगाची कॉटनची साडी; अभिनेत्री साक्षी गांधीचे नवीन फोटो पाहून चाहते घायाळ

Kkhushi Niramish

सहकुटुंब सहपरिवार फेम अभिनेत्री साक्षी गांधीने नुकतेच गुलाबी रंगाच्या कॉटनच्या साडीत नवीन फोटो शेअर केले आहेत. | सर्व फोटो सौजन्य - Instagram - gandhisakshee
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील तिच्या अवनीच्या भूमिकेला लोकांनी खूप पसंत केले. या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.
मात्र, त्यापूर्वी 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत तिने एक छोटी भूमिका साकारली होती.
तिने मन उधाण वारा, हिरकणी या चित्रपटांमध्येही सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेक वेळा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या हटके लूकमध्ये फोटो शेअर करत असते.
या फोटोंमध्ये साक्षीने कॉटनच्या गुलाबी साडीसह नाकात नथ आणि अर्धचंद्राकृती मोठे कानातले घातले आहेत. बोटात मोठी गोल डिझाईनर अंगठी आणि गळ्यात सिंपल नेकलेस शोभून दिसत आहे.
तिचे मनमोहक आणि दिलखुलास हास्य यामुळे चाहते तिच्या या फोटोंवर घायाळ झाले आहेत.