चिकन की अंडी? कमी कॅलरीत जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी काय खाल?

किशोरी घायवट-उबाळे

प्रोटीनसाठी काय निवडाल? प्रोटीन वाढवायचे असेल तर चिकन आणि अंडी हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत, पण दोघांचे पोषणमूल्य वेगळे आहे. | (संग्रहित छायाचित्र)
१०० ग्रॅम शिजवलेल्या स्किनलेस चिकनमध्ये सुमारे ३१ ग्रॅम प्रोटीन आणि १६५ कॅलरीज असतात.
१०० ग्रॅम उकडलेल्या अंड्यांमध्ये सुमारे १२. ६ ग्रॅम प्रोटीन आणि १५५ कॅलरीज असतात.
कमी कॅलरीत जास्त प्रोटीन दोन्ही पदार्थांच्या कॅलरीज जवळपास सारख्याच असल्या तरी चिकनमधून दुपटीहून अधिक प्रोटीन मिळते.
चिकनमध्ये व्हिटॅमिन B3, B6, फॉस्फरस आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात, जे स्नायू आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहेत.
अंड्याच्या बलकामध्ये व्हिटॅमिन A, D, E, B12 आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक कोलीन भरपूर प्रमाणात असते.
अंड्यांमध्ये ल्यूटिन आणि झिॲक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत करतात.
वजन कमी किंवा स्नायू वाढवायचे असतील तर... कमी कॅलरीत अधिक प्रोटीन हवे असेल तर चिकन हा अधिक प्रभावी पर्याय मानला जातो. | ESTHER OLADIPO
चिकन जास्त प्रोटीन देते, तर अंडी अनेक महत्त्वाच्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात.
त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार दोन्हींचा संतुलित आहारात समावेश करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)