बालदिनानिमित्त कार्तिकी गायकवाडचं लेकासोबत खास फोटोशूट; मायलेकाच्या गोड क्षणांनी वेधलं लक्ष
Mayuri Gawade
लोकप्रिय मराठी गायिका कार्तिकी गायकवाडने बालदिनानिमित्त तिचा मुलगा रिशांक पिसेसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कार्तिकीने शेअर केलेल्या या फोटोशूटमध्ये तिचा लाडका रिशांक आईच्या कुशीत अगदी मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे.
एका गोड फोटोमध्ये कार्तिकी आपल्या लेकाच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत असून रिशांकही कॅमेऱ्यासमोर मस्त पोझ देत आहे.
कधी आईसोबत खळखळून हसताना, तर कधी गोड हावभाव करताना दिसणाऱ्या रिशांकचा निरागस अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
या खास फोटोशूटसाठी कार्तिकीने साधा कॅज्युअल लूक केला असून रिशांकने पांढरा टी-शर्ट आणि फिकट तपकिरी रंगाची पँट घातली आहे.
कार्तिकीसोबतच रिशांकने बाबा रोनित पिसेसोबतही मजेशीर फोटो काढले असून दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.
आईच्या कुशीत असताना रिशांक कधी कॅमेऱ्याकडे पाहतोय, तर कधी आपल्या गोड हावभावांनी कार्तिकीला हसवताना दिसत आहे.
कार्तिकी आणि रोनित पिसे यांच्या आयुष्यात १४ मे २०२४ रोजी रिशांकचं आगमन झालं असून बालदिनानिमित्त शेअर केलेले मायलेकाचे हे गोड क्षण चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.