Ganeshotsav 2025 : श्रावणी सरीत चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन! पाहा पहिली झलक

नेहा जाधव - तांबे

आगमनाधीश! तरुणाईच्या लाडक्या बाप्पाचं म्हणजेच मुंबईतील प्रसिद्ध गणपती चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन आज झालेलं आहे. | (Photo - Insta/chinchpoklichachintamani)
श्रवणाच्या भर पावसात, सरीत भिजत चिंतामणी भक्तांच्या सेवेत आलेला आहे. | (Photo - Insta/iamswaap)
लाडक्या चिंतामणीच्या देखण्या रुपाचं दर्शन घेण्यासाठी आगमन सोहळ्यात लाखो भक्तांचा उत्साहाने जमलेला मेळा पाहायला मिळतोय | (Photo - Insta/iamswaap)
मुंबईतील सर्वात जुने आणि मानाचे गणेशमंडळ म्हणून ओळखला जाणारा चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा १०५ वर्षांचा झाला आहे. | (Photo - Insta/iamswaap)
लाल रंगाचं धोतर, लाल रंगाचा शेला परिधान करून शाही सिंहासनावर बसून चिंचपोकळीच्या चिंतामणीचं शाही आगमन झालं. तर राजबिंडासारखा दिसतोय यंदाचा चिंतामणी! | (Photo - Insta/Ganpatibappamorya_)
त्याचं रूप इतकं देखणं आहे, जणू काही एका हाताने तो भक्तांना आशीर्वाद देत चिंतामणीने आगमन केलं आहे. | (Photo - Insta/iamswaap)