रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत -दालचिनी इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास हातभार लागतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - चयापचय (Metabolism) सुधारण्यास मदत होत असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास दालचिनी फायदेशीर ठरू शकते.
पचनक्रिया सुधारते - अपचन, गॅस आणि पोटफुगी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनी उपयुक्त मानली जाते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते - दालचिनीतील अँटिऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर - वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास दालचिनी मदत करू शकते.
त्वचेसाठी ठरते लाभदायक - दालचिनीतील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान कमी करून नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)