Diwali 2025 : दिवाळीत मातीचे दिवे लावण्यामागचा खरा अर्थ माहितीये?

Mayuri Gawade

दिवाळीत मातीचे दिवे लावण्यामागे एक विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे. | सर्व छायाचित्रे : पिंटरेस्ट
या दिवशी अंधारावर प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याचा विजय साजरा केला जातो.
घराभोवती मातीचे दिवे लावून सकारात्मक ऊर्जेला आकर्षित केले जाते.
रामायणानुसार, भगवान राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी आनंदाने मातीचे दिवे लावले आणि शहर उजळले.
मातीचे दिवे नैसर्गिक मातीपासून बनवले जातात, त्यामुळे ते पर्यावरणपूरक आहेत.
या दिव्यांचा प्रकाश नकारात्मक शक्ती दूर करतो आणि घरात सुख-शांती निर्माण करतो.
तसेच, सर्वजण मिळून दिवे लावत असल्यामुळे समाजात एकोपा आणि प्रेमाची भावना वाढते.
मातीचे दिवे लावणे ही भारतीय परंपरेची ओळख असून आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवते.
दिवाळीत उजळलेले प्रत्येक दीप हे आनंद, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचवतात.