रोज लवंग खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

किशोरी घायवट-उबाळे

दातदुखीपासून त्वरित आराम : लवंगामध्ये असलेले युजेनॉल घटक दातदुखी आणि हिरड्यांच्या वेदनांवर प्रभावी ठरतात. त्यामुळे दातदुखीत लवंग चघळण्याचा सल्ला दिला जातो. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
पचनक्रिया सुधारते : लवंग खाल्ल्याने अपचन, गॅस, पोटफुगी आणि आम्लपित्ताची समस्या कमी होते. जेवणानंतर एक लवंग खाणे फायदेशीर ठरते.
सर्दी-खोकल्यावर गुणकारी : लवंग गरम गुणधर्माची असल्याने सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यास मदत करते.
तोंडातील दुर्गंधी दूर होते : लवंग चघळल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दुर्गंधी येत नाही.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची इम्युनिटी मजबूत करतात.
वेदना आणि सूज कमी करते : लवंगाचे दाहशामक गुण सांधेदुखी, डोकेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत : नियमित मर्यादित प्रमाणात लवंग सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)