नारळाचं तेल की मॉईश्चरायजर? थंडीत मऊ आणि फ्रेश त्वचेसाठी काय आहे योग्य, जाणून घ्या

Mayuri Gawade

हिवाळ्यात थंड हवेमुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते आणि अनेकदा चेहरा खेचल्यासारखा वाटतो.
मॉईश्चरायजर त्वचेला ओलावा देऊन तो टिकवून ठेवण्यास मदत करते.
नारळाचं तेल त्वचेवर एक संरक्षक थर तयार करून ओलावा बाहेर जाण्यापासून रोखते.
तेलकट आणि मुरुम येणारी त्वचा असल्यास नारळाच्या तेलाऐवजी हलकं मॉईश्चरायजर वापरणं योग्य ठरतं.
अत्यंत कोरड्या आणि खडबडीत त्वचेसाठी रात्री नारळाच्या तेलाचा पातळ थर लावता येतो.
थंडीत नारळाचं तेल घट्ट होत असल्याने ते चेहऱ्यावर लावणं आणि पसरवणं थोडं कठीण जाऊ शकतं.
दिवसा बाहेर जाताना मॉईश्चरायजर लावल्यानंतर सनस्क्रीन लावणं अधिक सोयीचं ठरतं.
संवेदनशील त्वचा असल्यास नारळाचं तेल वापरण्यापूर्वी काळजी घ्या, कारण ते प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईलच असं नाही.
चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आधी हलकं मॉईश्चरायजर लावा आणि त्यानंतर नारळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब लावा. | All Photos : AI Generated