विड्याच्या पानांचं थंडगार सरबत; उन्हाची तीव्रता जाणवणार नाही; रेसिपी एकदम सोपी

Kkhushi Niramish

उन्हाळा सुरू असल्यामुळे प्रत्येकालाच काही ना काही थंडगार प्यावेसे वाटते. ज्यूस, लस्सी, सरबत असे खूप ऑप्शन्स असतात. मात्र, पारंपारिक गार सरबतांची गोष्टच वेगळी असते. विड्याच्या पानांचं थंडगार सरबत हे असेच पारंपारिक पेय आहे. जे तीव्र उन्हाळ्यात तुम्हाला शरीरातून हायड्रेट ठेवतो. तसेच आल्हाददायक गारवा देतो. ही रेसिपी फारच सोपी आहे. हे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम बडीशेप आणि विलायची एका बाऊलमध्ये पाणी घालून भिजायला ठेवा. | Papa Mummy Kitchen - Facebook page
बाजारात येणाऱ्या दोन प्रकारच्या खाण्याच्या डिंकापैकी जो न चमकणारा प्लेन डिंक आहे तो निवडायचा आहे.
हा डिंक एक वाटी पाण्यात भिजायला ठेवा.
१५ ते २० हिरवीगार विड्याची पानं छान धुवून घ्या.
ही विड्याची पाने छान कापून बारीक करून घ्या. जेणेकरून ती मिक्सरमधून बारीक करून घेता येईल.
विड्याच्या पानांची मिक्सरमध्ये अशी हिरवीगार छान पेस्ट तयार करा. त्यामध्ये गुलकंद घालून ही पेस्ट पुन्हा एकदा मिक्सरमधून एकजीव करून घ्या.
त्यानंतर भिजायला ठेवलेली बडीशेप आणि विलायची याचीही मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्या.
नंतर विड्याच्या पानाची आणि बडिशेपची पेस्ट एकत्र करून ती तापवून घ्या. त्याचवेळी यामध्ये साखर घाला.
मिश्रण चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग घाला.
नंतर हे मिश्रण गाळणीतून गाळून घ्या.
हा डिंक एक लिटर दुधात मिक्स करून घ्या.
त्यामध्ये तयार केलेले विड्याच्या पानाचे मिश्रण दोन मोठे चमचे घाला. बाकीचे मिश्रण नंतर वापरण्यासाठी हवाबंद बरणीत ठेवून द्या.
दुधात सब्जा घाला हे गुणाने थंड असते.
सरते शेवटी यामध्ये बर्फ आणि गुलाब पाकळ्या अॅड करा.
एक लिटर दुधात किमान ६ ग्लास सरबत तयार होते.