बद्धकोष्ठाचा त्रास आहे? एक चमचा बडीशेप 'या' पद्धतीने खा आणि पाहा फरक

Kkhushi Niramish

आपल्याकडे जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. तुम्हाला माहित आहे का याचे कारण?
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अन्न पचन लवकर असते. कारण बडीशेपमध्ये अन्नपचनासंबंधित गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.
तुम्हाला जर बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर यामध्ये बडीशेप तुम्हाला खूप आराम देऊ शकते.
एक मोठा चमचा बडीशेपचे पाणी रात्री झोपण्यापूर्वी उकळून पिल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. बडीशेप हा सर्वात उत्तम आणि कोणताही साईड इफेक्ट न देणारा उपाय आहे. तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास किती प्रमाणात आहे. यावर तुम्ही बडीशेपचे किती चमचे घ्यावी आणि किती पाणी प्यावे हे अंदाज घेऊन ठरवा.
बद्धकोष्ठा व्यतिरिक्त तुम्हाला पोटाच्या अन्य काही समस्या असतील तर मेडिकलमध्ये बडीशेपचा अर्क देखील मिळतो. एक छोटा चमचा अर्क साखरेत घेऊन खाल्ल्याने पोटाच्या अनेक तक्रारी दूर होण्यास मदत होते.