खरंच! 'या' देशात एकही मच्छर नाही..

Suraj Sakunde

मच्छर चावल्यानं डेंगू, मलेरियासमवेत अनेक घातक रोग आजार होऊ शकतो. | fpj
गरमीच्या दिवसात तर मच्छरांचा त्रास आणखीनच वाढतो.
मच्छर चावल्यामुळं होणाऱ्या आजारांमुळं दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. | fpj
जगभरात मच्छरांच्या ३ हजार प्रजाती आहेत. | fpj
पण तुम्हाला माहिती आहे का, की जगातला एक देश असा आहे जिथं एकही मच्छर नाही. | fpj
उत्तर अटलांटिक महासागरात स्थित आइसलँड मध्ये एकही मच्छर नाही. | fpj
आइसलँडमध्ये हवामान वेगात बदलतं. या वेगात होणाऱ्या हवामान बदलामुळं मच्छर त्यांचं लाइफ सायकल पूर्ण करू शकत नाहीत. | fpj
आइसलँडमध्ये तापमान कमी असल्यामुळं पाण्याचं बर्फात रुपांतर होतं. | fpj
आइसलँडमधील तापमान उणे ३८ अंश सेल्सियसपर्यंत खाली जातं. त्यामुळं मच्छरांचं प्रजनन अशक्य आहे. | fpj
याशिवाय आइसलँडमधील पाणी, माती आणि हवामान मच्छरांच्या प्रजांतींसाठी पोषक नसल्याचं संशोधक सांगतात. | fpj
परंतु आइसलँडच्या शेजारी असणाऱ्या नॉर्वे, डेन्मार्क, स्कॉटलंड तसंच ग्रीनलँडमध्ये मच्छर आढळतात. | fpj