Cooking Tips : डाळ झटपट शिजवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
किशोरी घायवट-उबाळे
डाळ आधी हलकी भाजून घ्या : डाळ २–३ मिनिटे ड्राय रोस्ट केल्यास ती लवकर शिजते आणि चवही अधिक छान लागते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
मसूर किंवा मूग डाळ या पटकन शिजतात, त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात.
डाळ शिजताना मध्येच हलकं ब्लेंड करा : १० ते १५ मिनिटांनंतर डाळ थोडी ब्लेंड केल्यास ती अधिक पटकन मऊ होते आणि टेक्स्चर क्रीमी मिळते.
मीठ शेवटी घाला : सुरुवातीलाच मीठ घातल्यास डाळ शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे मीठ शेवटी घालणं फायदेशीर ठरतं.
टोमॅटो किंवा आंबट पदार्थ उशिरा घाला : टोमॅटो, चिंच किंवा लिंबातील घटकांमुळे डाळ मऊ होण्यास वेळ लागतो.
चिमूटभर बेकिंग सोडा वापरा : थोडासा बेकिंग सोडा घातल्यास डाळ लवकर शिजते, पण प्रमाण खूप कमी ठेवा.
डाळ भिजवून ठेवा : ३० मिनिटे ते १ तास डाळ भिजवल्यास ती पटकन शिजते आणि पचायलाही हलकी होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)