Cooking Tips : वरणात चुकून हळद जास्त पडली? अजिबात टेन्शन घेऊ नका; 'या' सोप्या टिप्स येतील कामी
किशोरी घायवट-उबाळे
वरण बनवताना कधी कधी अंदाज चुकतो आणि त्यात हळद जास्त पडते.
हळद जास्त झाल्यामुळे वरणाचा रंग खूप पिवळा दिसू लागतो, तर चवही बदलू शकते.
अशावेळी संपूर्ण वरण फेकून देण्याची किंवा पुन्हा बनवण्याची गरज नाही.
वरणात थोडे शिजवलेले डाळीचे पाणी किंवा साधे पाणी घालून त्याचे प्रमाण वाढवा.
वरण खूप घट्ट झाले असेल, तर थोडे गरम पाणी घालून योग्य घट्टपणा आणा.
चव संतुलित करण्यासाठी आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालू शकता.
शेवटी जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लसूण यांची खमंग फोडणी दिल्यास वरणाची चव अधिक छान होईल.
मात्र, हे पदार्थ थोडेथोडे घालून चव तपासा. म्हणजे हळदीचा जास्तपणा कमी जाणवेल आणि वरणही चविष्ट बनेल.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)