मासे तळताना तुटतात? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल कुरकुरीत फिश फ्राय

किशोरी घायवट-उबाळे

योग्य मासा निवडा - सुरमई, पापलेट, रोहू किंवा कतला यांसारखे घट्ट मांसाचे मासे तळण्यासाठी उत्तम ठरतात.
मासे पूर्णपणे कोरडे करा - मासे धुतल्यानंतर किचन टॉवेलने पुसून कोरडे करा. त्यामुळे ते पॅनला चिकटत नाहीत.
योग्य मसाला लावा - हळद, तिखट, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ यांचा समतोल मसाला वापरा.
मसाला मुरू द्या - मसाला लावल्यानंतर मासे किमान १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा.
कुरकुरीत कोटिंग करा - रवा, तांदळाचे पीठ किंवा बेसन लावल्यास फिश फ्रायला छान कुरकुरीत पोत मिळतो.
तेल योग्य तापमानाला गरम करा - खूप थंड किंवा खूप गरम तेलात मासे तळू नका. मध्यम गरम तेल सर्वोत्तम.
घाईत मासे पलटवू नका - एका बाजूने सोनेरी रंग आल्यावरच हलक्या हाताने मासा पलटवा.
योग्य पॅन वापरा - लोखंडी तवा किंवा जाड बुडाची कढई वापरल्यास मासे समान शिजतात.
एकावेळी कमी मासे तळा - पॅनमध्ये जास्त तुकडे टाकल्यास तापमान कमी होते आणि मासे तुटू शकतात.
सर्व्ह करण्याची योग्य पद्धत - तळलेले मासे टिश्यूवर ठेवून अतिरिक्त तेल काढा आणि लिंबू, कांदा व हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)