पिंपल्सपासून सुटका हवी? तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे 'हे' फायदे नक्की वाचा

किशोरी घायवट-उबाळे

तांब्याच्या पाण्यातील गुणधर्म त्वचेसाठी, चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पोटातील असंतुलन आणि अस्वच्छता ही पिंपल्सची मुख्य कारणे आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी या समस्यांवर गुणकारी ठरते.
त्वचेच्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते प्या.
तांब्याचे गुणधर्म - तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, जे शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करतात.
शरीरावर परिणाम - हे पाणी पोटातील उष्णता कमी करते आणि पचन सुधारते.
त्वचेसाठी फायदे - पोट साफ राहिल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा निरोगी राहते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)