Cotton Saree Hacks : कॉटन साडी जास्त दिवस टिकवायची? धुणं, इस्त्री आणि स्टोरेजसाठी खास टिप्स
Mayuri Gawade
उन्हाळ्यात कॉटन साड्या आरामदायी वाटतात, पण योग्य काळजी घेतली नाही तर त्या पटकन चुरगळतात.
कॉटन साडी धुताना सॉफ्ट किंवा लिक्विड स्टार्च वापरल्यास साडी अधिक कडक आणि फ्रेश दिसते.
कॉटन साडी नेहमी थंड पाण्यात धुवावी; गरम पाण्यामुळे साडीचा रंग फिका पडू शकतो.
साडी जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नये; ८ ते १० मिनिटे पुरेशी मानली जातात.
धुतल्यानंतर साडी जोरात पिळण्याऐवजी हलक्या हाताने झटकून वाळत घालणं अधिक योग्य ठरतं.
कॉटन साडी नेहमी सावलीत वाळत घातल्यास तिचा रंग आणि फॅब्रिक अधिक दिवस टिकून राहतो.
इस्त्री करताना खूप गरम इस्त्री वापरणं टाळावं; त्यामुळे साडीचा कापड खराब होऊ शकतो.
कॉटन साडी मलमल किंवा मऊ कापडात गुंडाळून ठेवल्यास ती अनेक वर्षे नव्यासारखी टिकून राहू शकते. | ALL PHOTOS : AI GENERATED