उन्हाळ्यात घरोघरी महिला कुरडई, पापड, सांडगे वर्षभरासाठी तयार करून ठेवतात. त्यासोबत दही मिरची हा देखील पारंपारिक पदार्थ तुम्हाला तयार करून ठेवता येईल. दही मिरची बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. त्यासाठी जाडसर तसेच मध्यभागी फुगीर असलेल्या मोठ्या हिरव्या मिरच्या घ्या. यामध्ये दह्याचे सारण भरता येईल, अशा मिरच्या हव्या.