दररोजच्या या सोप्या सवयी ठरू शकतात 'लाइफसेव्हर'!

Mayuri Gawade

काम, घर, कुटुंब, जबाबदाऱ्या... या सगळ्यांत आपण सगळेच व्यस्त असतो. | pinterest
आणि याच धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. | pinterest
पण काही सवयी अशा असतात, ज्या फारशा कठीण नाहीत, पण त्यांचा परिणाम मात्र खोलवर होतो. | pinterest
या सवयी अंगीकारल्या, तर अनेक आजारांपासून दूर राहता येतं, आणि आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येतं. | freepik
छातीत कोणतीही वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता वाटल्यास ती दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांकडे जावे. | freepik
दररोज ७–८ तासांची गाढ आणि शांत झोप घ्यावी. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही झोप अत्यंत गरजेची आहे. | freepik
शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही, तर त्याचे परिणाम हळूहळू अनेक अवयवांवर दिसू लागतात, म्हणून दिवसभरात कमीत कमी ८–१० ग्लास पाणी प्यावं. | freepik
चालणं हा सर्वात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. दिवसातून फक्त ३० मिनिटं चालण्याची सवय तुमचं हृदय, साखर आणि वजन सगळं नियंत्रणात ठेवू शकते. | freepik
अति प्रक्रियायुक्त (ultra-processed) पदार्थ शक्यतो टाळावेत. हे पदार्थ अनेक दीर्घकालीन आजारांना कारणीभूत ठरतात. | freepik
नियमित आरोग्यतपासण्या करा. यामुळे ‘सायलेंट किलर्स’ म्हणून ओळखले जाणारे आजार (जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह) यांविषयी वेळेत माहिती मिळते. . | freepik
आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या शरीराकडून मिळणाऱ्या लहानसहान संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत लक्ष दिले, तर मोठे नुकसान टाळता येते. | freepik
लक्षात ठेवा, आरोग्याच्या बाबतीत लहान बदलही मोठा फरक घडवतात. | freepik