रोजच्या वापरासाठी हलकी आणि क्लासी मंगळसूत्रं; ऑफिस ते पार्टी- प्रत्येक लुकसाठी परफेक्ट!
Mayuri Gawade
उन्हाळ्यात जड दागिने टाळून हलकं, नाजूक आणि क्लासी लुक देणारे मंगळसूत्र आजकाल ट्रेंडमध्ये आहेत.
रोजच्या वापरासाठीही हे डिझाइन्स परफेक्ट ठरतात. सिंपल पण एलिगंट!
हार्ट शेप पेंडंट असलेलं हे डिझाइन थोडं ट्रेंडी आणि क्यूट आहे. कॅज्युअल टॉप्स किंवा डेट लुकसाठी योग्य.
हे छोटं डायमंड पेंडंट असलेलं मंगळसूत्र ऑफिसवेअर शर्ट किंवा फॉर्मल टॉपवर खूप छान दिसतं. रोज वापरासाठी हलकं आणि क्लासी.
डबल लेयर चेन स्टाईल थोडा स्टायलिश लुक देते. फॉर्मल ड्रेस किंवा वनपीसवर हे खूप एलिगंट दिसतं.
फ्लोरल डायमंड पेंडंट असलेलं मंगळसूत्र पार्टी किंवा फॉर्मल मिटिंगसाठी परफेक्ट आहे. साध्या आउटफिटलाही रिच लुक देते.
अतिशय मिनिमल ब्लॅक बीड्स डिझाइन, जे कुठल्याही वेस्टर्न आउटफिटवर सहज मॅच होतं. डे-टू-डे वापरासाठी परफेक्ट.
सिंपल आणि पारंपरिक टच असलेलं हे डिझाइन साडी किंवा कुर्तीवर खूप छान दिसतं. ऑफिस किंवा छोटे फंक्शन दोन्हीसाठी योग्य.
नावासोबतचं पर्सनलाइज्ड मंगळसूत्र युनिक आणि स्टायलिश वाटतं. रोजच्या वापरासाठी आणि खास गिफ्टसाठी परफेक्ट.
ड्रॉप डिझाइन असलेलं मंगळसूत्र इंडो-वेस्टर्न कपड्यांवर खूप उठून दिसतं. खास प्रसंगी वापरायला छान.
इन्फिनिटी डिझाइन मॉडर्न आणि सिम्बॉलिक लुक देते. ब्लेझर किंवा फॉर्मल आउटफिटसोबत खूप क्लासी दिसतं. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट