डाळ-तांदूळ प्लास्टिकच्या डब्यात ठेवता? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा!
Mayuri Gawade
पूर्वी स्वयंपाकघरात डाळ, तांदूळ आणि इतर धान्य साठवण्यासाठी प्रामुख्याने स्टीलच्या डब्यांचा वापर केला जायचा.
आता अनेक घरांमध्ये स्टीलच्या डब्यांची जागा पारदर्शक आणि आकर्षक प्लास्टिकच्या बरण्यांनी घेतली आहे.
प्लास्टिकचे डबे हलके आणि हाताळायला सोपे असल्याने अनेकजण त्यांचा वापर करतात.
मात्र, अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकचे डबे वापरणं आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत 'drtarangkrishna' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये गरम पदार्थ भरून ठेवणं टाळायला हवं.
प्लास्टिकच्या डब्यांमधून काही रसायने अन्नपदार्थांमध्ये मिसळण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
ओलसर, आम्लधर्मीय आणि तेलकट पदार्थ प्लास्टिकच्या डब्यांमध्ये साठवून ठेवणं टाळावं, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
प्लास्टिकचे डबे वापरताना ते अन्न साठवण्यासाठी योग्य दर्जाचे आहेत की नाही, हे तपासणं महत्त्वाचं आहे. | All Photos : AI Genetrated