कोंड्याने त्रासलात? करा 'हे' सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब

Krantee V. Kale

हिवाळ्यात कोंडा ही एक सामान्य समस्या आहे. कोंड्यामुळे केस गळणे, टाळूला खाज सुटणे, रॅशेज होणे अशा समस्या उद्भवतात. | All Photos- yandex
आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळेल.
लिंबाचा रस पाण्यात मिसळून टाळूला लावा. लिंबातील अॅसिड टाळू स्वच्छ करते आणि बुरशीजन्य संसर्ग कमी करते.
कोरफडीचे जेल टाळूला मॉइश्चराइझ करण्यास मदत करते. आठवड्यातून २-३ वेळा कोरफडीचे जेल लावल्याने खाज सुटणे आणि कोरडेपणा कमी होतो.
नारळाच्या तेलात अँटीफंगल गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी केसांना थोडेसे तेल लावल्याने कोंडा हळूहळू कमी होण्यास मदत होते.
हेअर जेल, हेअर स्प्रे किंवा कंडिशनरचा जास्त वापर केल्याने कोंडा वाढू शकतो. म्हणून या प्रोडक्टसचा मर्यादित प्रमाणात वापर करा.
तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे केस आणि टाळू निरोगी राखण्यास मदत होते.
टाळूवर घाण आणि धूळ साचल्याने कोंडा वाढू शकतो. म्हणून दररोज सौम्य शॅम्पूने केस धुवा.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)