Deepika Padukone Birthday: कॉलेज फेस्ट ते थीम पार्टीसाठी ट्राय करा दीपिकाचे ५ सुपरहिट लुक्स
Mayuri Gawade
आज, सोमवार ५ जानेवारी २०२६ रोजी बॉलिवूडची वर्सटाइल क्वीन आणि स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.
अभिनयासोबतच तिच्या आयकॉनिक लुक्समुळेही ती आजही तरुणाईसाठी फॅशन आणि थीम पार्टीची पहिली पसंती ठरते.
कॉलेज फेस्ट, थीम पार्टी किंवा फॅन्सी ड्रेस इव्हेंटसाठी दीपिकाच्या या पाच लोकप्रिय व्यक्तिरेखा सहज कॅरी करता येतात.
बाजीराव मस्तानी - मस्तानी लुक : जड अनारकली, पारंपरिक दागिने, मोकळे केस आणि ठसठशीत मेकअप… मस्तानीचा हा रॉयल लुक मंचावर उतरताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो.
ओम शांती ओम - शांतीप्रिया लुक : गुलाबी रंगाचा भरजरी ड्रेस, विंटेज हेअरस्टाईल आणि लाईट पिंक लिपस्टिक हा लुक ग्लॅमर आणि जुन्या बॉलिवूडचा क्लासिक टच देतो.
ये जवानी है दिवानी - नैना तलवार लुक : साधे कुर्ते, मोकळे केस आणि मिनिमल मेकअप… हा लुक साधेपणा आणि ग्रेस एकत्र दाखवतो, जो कॉलेज फेस्टसाठी परफेक्ट आहे.
गोलियों की रासलीला राम-लीला - लीला सनेरा लुक : घाघरा-चोली, जड ऑक्सिडाइझ्ड दागिने, ठळक आयमेकअप आणि बिंदीसह हा लुक बंडखोर आणि फायरब्रँड व्यक्तिमत्त्व दाखवतो.
चेन्नई एक्सप्रेस - मीनम्मा लुक : रंगीत कांजीवरम साडी, फुलांची वेणी, गजरा आणि साउथ इंडियन टच असलेला मेकअप… मीनम्माचा हा लुक मजेशीर आणि हटके ठरतो.
हे पाच लुक्स केवळ कॉस्च्युम नाहीत, तर दीपिका पादुकोणच्या अजरामर व्यक्तिरेखांची ओळख आहेत.