लाल शिमरी गाऊनमधे दिया मिर्झाचा खास लूक!
Swapnil S
दिया मिर्झा ही एक भारतीय मॉडेल आणि सिने-अभिनेत्री व निर्माती आहे.
२००१ ला दियाने 'रहना है तेरे दिल में' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका तिने केल्या आहेत.
दिया ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चहत्त्यांसाठी शेअर करत असते.
दिया नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त तिने काही खास लूक केला आहे.
तिने लाल रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे. तिच्या या लूकला चाहत्यांनी पसंती दाखवली आहे.