दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी उपवासाबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का ?

प्रतिनिधी

१२ नोव्हेंबर रोजी शनिवारी संकष्टी असून रात्री ९ वाजून २ मिनिटांनी चंद्रोदय आहे.

प्रत्येक मासाच्या कृष्ण चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' हे व्रत साजरे केले जाते.

श्री कृष्ण बालवयात खूप खोडकर होते, त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा म्हणून यशोदा मातेने हे व्रत केले.

यादिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे.

नंतर गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवून उपवास सोडावा.

हे व्रत इच्छापूर्तीसाठी केले जाते. दिवसभर केलेल्या तपश्चर्येचा तना- मनाला आनंद मिळतो.

'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष ची ११ किंवा २१ आवर्तने करावी, शक्य नसल्यास एकदातरी म्हणावे अथवा श्रवण करावे.

आपली इच्छा देवाकडे प्रगट करावी व ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी.