बेली डान्सर नोरा फतेहीबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Rakesh Mali

अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मने जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे. ती ६ फेब्रुवारी २०२४ रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने सौंदर्याबरोबरच आपल्या नृत्याच्या माध्यमातून चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.
असे असले तरी नोराला करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ती पहिल्यांदा भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त पाच हजार रुपये होते. मूळची कॅनडाची असलेल्या नोराने मुंबईत येऊन आपले स्थान तर निर्माण केलेच पण त्याचबरोबरीने तिने कोट्यवधी रुपयांची संपत्तीही कमावली.
मुंबईत तिचे १० कोटी रुपये किंमतीचे आलिशान घर आहे. या घराचे इंटीरियर पीटर मारिनोने डिझाइन केले आहे. तसेच नोराकडे व्हॅनिटी व्हॅन आणि अनेक लग्झरी कार आहेत.
सुरुवातीला ५ हजार रुपये घेऊन भारतात आलेल्या नोराकडे आता एकूण ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. कठोर परिश्रम करुन आज ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. नोरा ही एक उद्योजिकाही आहे. तिची 'नोरा फतेही बाय वेसिमी' नावाची फॅशन लाइन आहे.
नोरा 'झलक दिखला जा' कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसत होती. त्यानंतर तिने फिफा वर्ल्ड कप २०२२मध्ये डान्स केला होता. प्रशिक्षित नृत्यांगना नाही, तिने स्वत: सराव करून नृत्याची कला आत्मसात केली. नोरा सुरुवातीच्या काळात डान्स शिकवायची, दिशा पटानी तिची विद्यार्थिनी आहे.