दिशा परमारचा साडीतील एलिगंट लूक चर्चेत; इंस्टाग्रामवरील फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ
किशोरी घायवट-उबाळे
अभिनेत्री दिशा परमारने तिच्या सोशल मीडियावर साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. | (Photo-Instagram)
गोल्डन बॉर्डर असणाऱ्या ऑरेंज शेडच्या साडीत दिशा सुंदर दिसत आहे.
खास डिझाईन केलेल्या या साडीवर दिशाने हेव्ही ज्वेलरी न घालता फक्त हिरव्या आणि लाल रंगाचे स्टोन असलेले झुमके घातले आहेत.
न्यूड मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली, स्लिव्हलेस ब्लाउज आणि पदरावर नक्षीकाम केलेली साडीने दिशाच्या रूपात भर पाडली आहे.
पोस्ट केलेल्या फोटोंना दिशाने 'साडी, बिंदी और झुमका' अशी छोटी पण लक्षवेधी कॅप्शन दिली आहे.
दिशाच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स येत असून तिच्या सिंपल लूकचे कौतुक केले जात आहे.