दिवाळीसाठी प्रत्येक महिलेला काहीतरी खास आणि आकर्षक पारंपरिक पेहराव करायचा असतो. अशावेळी सध्या ट्रेंडमध्ये असलेली कलांजली पैठणी तुमच्यासाठी एक सुंदर पर्याय ठरू शकते.
या पैठणीचे वैशिष्ट्य म्हणजे साडीसोबत मिळणारे हॅण्डवर्क केलेले आरी वर्क ब्लाऊज. या खास ब्लाऊजमुळे साडीचा रॉयल लूक अधिकच खुलून दिसतो.
कलांजली पैठणी जवळपास १० ते १२ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. जांभळा, निळा, गुलाबी, मोरपिशी, हिरवा आणि आकाशी अशा रंगांचे पर्याय यात पाहायला मिळतात.
या साडीची किंमत साधारण १,५०० ते २,८०० रुपयांपर्यंत असून, सिल्क, सॉफ्ट सिल्क, सेमी सिल्क आणि प्युअर सिल्क अशा प्रकारांनुसार किमती बदलतात.
लक्ष्मीपूजन, भाऊबीज किंवा दिवाळी पाडव्याच्या दिवशी पारंपरिक आणि आकर्षक लूक हवा असेल, तर ही पैठणी नेसण्याचा विचार करू शकता.
या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या कापडापासून लहान मुलींसाठी सुंदर फ्रॉक शिवता येतो. तसेच याच कापडापासून जॅकेट, कोट किंवा ब्लेझर तयार करून इतर साड्यांवरही स्टायलिश लूक करता येतो.
कलांजली पैठणीची खरेदी विविध साडी दुकाने, ऑनलाइन बुटीक आणि इन्स्टाग्राम पेजवरून करता येते. मात्र, खरेदी करताना हॅण्डवर्क आणि मशीन वर्क ब्लाऊजमधील फरक तसेच कापडाचा प्रकार तपासून घ्या.
या साडीची देखभाल करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. साडीला डाग लागल्यास घरी धुण्याऐवजी ड्राय क्लिनिंग करून घ्या, जेणेकरून साडीचा रंग आणि कापड टिकून राहण्यास मदत होईल.
साडीच्या किमती आणि उपलब्ध रंग विक्रेत्यानुसार बदलू शकतात. खरेदीपूर्वी त्याची खात्री करून घ्या.