Diwali Home Decoration Ideas : यंदाच्या दिवाळीत तुमच्या घराचा लुक बदलून टाका: पेंडेंट लाईट्सने सजवा प्रत्येक कोपरा!
Mayuri Gawade
आपल्या हिंदू संस्कृतीत सणसमारंभांची कमी नाही. नवरात्री संपली की लगेच दिवाळीची तयारी सुरू होते. | सर्व छायाचित्रे : पिंटरेस्ट
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा सण. ज्यामुळे घरात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते.
म्हणूनच फक्त फराळ आणि नव्या कपड्यांपुरते मर्यादित न राहता, घराच्या कोपऱ्यांना स्टायलिश लूक देण्यासाठी पेंडेंट लाईट्सचा वापर खूप उपयुक्त ठरतो.
अशा काही लाइट्स पुढीलप्रमाणे आहेत -
रीसेस्ड लाईट्स (Recessed Lights): या लाइट्स लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये सोबर आणि आरामदायक वातावरण तयार करतात.
शॅन्डलियर्स (Chandeliers): झुंबरासारखे हे दिवे किचनमध्ये किंवा हॉलमध्ये उत्साही मूड निर्माण करतात.
क्लस्टर पेंडेंट लाईट (Cluster Pendant Lights): या लाइट्स म्हणजे अनेक दिव्यांचा समूह, जो घराला रॉयल आणि स्टायलिश लूक देतो.
इन्वर्टेड अप-लाइट पेंडेंट लँप (Inverted/up-light Pendant Lamp): हे दिवे लिव्हिंग रूमच्या कोपऱ्यात आरामदायक आणि सुंदर वातावरण तयार करतात.
या दिवाळीत तुमच्या घराचं सौंदर्य अधिक खुलवायचं असेल, तर या स्टायलिश पेंडेंट लाईट्सचा वापर करून घराला एक नवा लूक द्या!