Diwali Padwa 2026 : यंदाच्या पाडव्याला पत्नीला द्या हटके गिफ्ट; 'या' आयडिया एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

सोन्याचे किंवा चांदीचे दागिने - पत्नीला दागिन्यांची आवड असेल तर सुंदर नेकलेस, कानातले, अंगठी किंवा चांदीची पैंजण भेट देऊ शकता.
सुंदर साडी - पाडव्याच्या दिवशी पत्नीला तिच्या आवडीच्या रंगाची सिल्क, पैठणी किंवा डिझायनर साडी भेट देऊन आनंदित करू शकता.
आवडीचे परफ्यूम - पत्नीला आवडणारा सुगंधी परफ्यूम किंवा फ्रॅग्रन्स सेट ही एक सुंदर आणि उपयोगी भेट ठरू शकते.
स्टायलिश हँडबॅग - ऑफिस, शॉपिंग किंवा रोजच्या वापरासाठी उपयोगी पडेल अशी ट्रेंडी हँडबॅग पत्नीला भेट देऊ शकता.
स्मार्टवॉच किंवा सुंदर घड्याळ - टेक्नॉलॉजीची आवड असलेल्या पत्नीला स्मार्टवॉच, तर क्लासिक लूक आवडत असल्यास सुंदर घड्याळ भेट द्या.
स्किनकेअर गिफ्ट हॅम्पर - तिच्या आवडीची स्किनकेअर उत्पादने, बॉडी लोशन, फेस सीरम आणि सेल्फ केअर प्रोडक्ट्सचा सुंदर हॅम्पर तयार करा.
रोमँटिक डिनर डेट - नेहमीच्या धावपळीतून वेळ काढून पत्नीला आवडत्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी घेऊन जा. हा अनुभव तिच्यासाठी खास ठरू शकतो.
सरप्राइज ट्रिप - पत्नीला फिरण्याची आवड असेल तर एखाद्या सुंदर ठिकाणी वीकेंड ट्रिप प्लॅन करा. एकत्र घालवलेला वेळ हीदेखील सुंदर भेट ठरू शकते.
दिवाळी पाडव्याला पत्नीला दिलेल्या भेटवस्तूची किंमत महत्त्वाची नसते, तर त्यामागची भावना महत्त्वाची असते. तिच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दिलेलं छोटंसं गिफ्टही तिच्यासाठी अविस्मरणीय ठरू शकतं.