बाप्पाच्या स्वागताला ज्ञानदा रामतीर्थकरचा मराठमोळा अंदाज; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
किशोरी घायवट-उबाळे
आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरीही बाप्पाचे उत्साहात आगमन झाले आहे.
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवामुळे ज्ञानदा आणि हर्षद यांच्या घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी त्यांच्या घराची गुलाबी आणि पांढऱ्या फुलांनी अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे.
बाप्पाच्या लोभस मूर्तीसमोर ज्ञानदा आणि हर्षद यांनी हात जोडून भक्तिभावाने खास फोटोसाठी पोझ दिली आहे.
यावेळी ज्ञानदाने हिरव्या रंगाची लाल काठाची खणाची साडी आणि लाल ब्लाऊज परिधान करून सुंदर पारंपरिक लूक केला आहे.
मोत्यांचा आणि खड्यांचा चोकर, मंगळसूत्र आणि केसांमधील गजऱ्यामुळे ज्ञानदाचा पारंपरिक लूक आणखी खुलून दिसत आहे.
लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असल्याने ज्ञानदा आणि हर्षद यांच्यासाठी यंदाचा बाप्पाचा उत्सव विशेष आठवणींचा ठरणार आहे.
ज्ञानदाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.