सुर्यनमस्कार घाला आणि फिट राहा!

Swapnil S

पोट आणि मजन कमी हाईल- नियमित सुर्यनमस्कार घातल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. डाएटिंगहून अधिक जलद जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सुर्यनमस्कार हा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय यामुळे पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होईल. | PM
ग्लोइंग त्वचा- दररोज सुर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते. तसचं त्वचेसंबधीच समस्या दूर होतात. सुर्यनमस्कारामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होवून तुम्ही तरुण दिसू लागता. तरुण दिसण्यासाठी नियमित ११ सुर्यनस्कार घालणं फायदेशीर ठरू शकतं. | PM
शरीर डिटॉक्स करण्यास मदत- सुर्यनमस्कार करताना योग्यरित्या श्वासोच्छवास घेणं गरजेचं आहे. यामुळे आसन करताना हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचते. परिणामी रक्तामध्ये आॅक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि शरीरातील कार्बनडॉक्साईड आणि इतर विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते. सुर्यनमस्कारामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. | PM
पचन सुधारतं- नियमित सुर्यनमस्कार केल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यास मदत होते. तसचं पचनसंस्थेत रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. सुर्यनमस्कारामुळे आतड्यांचं कार्य देखील सुधारत. तसचं गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सुर्यनमस्कार फायदेशीर आहेत. | PM