कोणते फळ कधी खावे याचे नियम माहित आहे का? पाहा योग्य वेळी फळे खाण्याचे फायदे

Kkhushi Niramish

उत्तम आरोग्यासाठी फळे खाणे हे कधीही चांगले असते. मात्र, आहार शास्त्रानुसार कोणते फळ कधी खावे याचे काही नियम आहेत. काही फळे सकळी खाणे फायदेशीर ठरते. तर काही दुपारी किंवा संध्याकाळी पाहा कोणती फळे कोणत्या वेळेत खाल्ली तर ठरतात फायदेशीर
केळी हे शरीरातील ऊर्जा वाढवणारे सर्वोत्तम फळ आहे. हे फळ केव्हाही खाल्लेले चालते. मात्र, सकाळी थोडी न्याहरी करून केळी खाणे सर्वात चांगले असते. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि तुमची कार्यक्षमता वाढते.
सफरचंद हे फळ देखील केळीप्रमाणे सकाळी खाल्लेले उत्तम राहते. रोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला सातत्याने भूक लागत नाही. तसेच तुम्ही शरीरात काम करण्यासाठी शक्ती टिकून राहते.
द्राक्षे ही कधी गोड तर कधी आंबट असतात. त्यामुळे द्राक्षे कधी सकाळी खाऊ नये. दुपरच्या जेवणानंतर द्राक्षे खाणे चांगले असते. तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्रीच्या जेवणानंतर देखील तुम्ही द्राक्षे खाऊ शकता. त्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. मात्र त्याचे प्रमाण तुम्हाला तुमच्या शरीराप्रमाणे ठरवावे लागेल. शिवाय रात्री द्राक्षे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
संत्रे हे लिंबूवर्गीय फळ आहे. यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. मात्र अधिकतम वेळा संत्री आंबट असतात. त्यामुळे ते कधीही दुपारच्या सत्रात खाणे योग्य असतात.
कडक उन्हाच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने तुचचे शरीर डिहायड्रेट होण्यापासून रोखते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने उष्णतेपासून आराम मिळतो.
खरबूज किंवा चक्री हे कलिंगडाप्रमाणेच असते. यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते कडक उनाच्या वेळी खाल्ल्यास फायदेशीर ठरते.
मोसंबी हे देखील संत्र्याप्रमाणे लिंबूवर्गीय फळ आहे. मात्र यामध्ये आंबटपणा कमी असतो. मोसंबी ही गोड असते. मोसंबी हे फळ दुपारी खाल्ल्यास त्याचे जास्त चांगले फायदे मिळतात.
चिकू हे फळ तुम्ही कोणत्याही वेळेत खाऊ शकता मात्र द्राक्षांप्रमाणेच हे फळ देखील बद्धकोष्ठतेत पोट साफ होण्यासाठी मदत करते. त्यामुळे रात्री चिकू खाल्ल्यास सकाळी पोट साफ होण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
पेरू खाण्याची उत्तरम वेळी ही थोडं ऊन पडल्यानंतर अर्थात सकाळी 10 नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत खाल्ल्यास फायदेशीर ठरते. संध्याकाळनंतर थंडी वाढते. त्यावेळी पेरू खाल्ल्याने आजारी पडण्याची शक्यता असते.
स्ट्रॉबेरी हे फळ तुम्ही दिवसातील कोणत्याही वेळेत खाऊ शकतात.