Suraj Sakunde
डाळींब शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. अनेक लोकांना डाळींबाचा सर प्यायला आवडतं.
दररोज डाळींबाचा रस प्यायल्याने शरीराला काय फायदे होतात, हे आपण पाहणार आहोत.
डाळींबामध्ये विटामिन-सी विपुल प्रमाणात आढळतं. त्यामुळं दररोज डाळींब रस प्यायल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते.
डाळींबामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि अॅनिमियासारख्या गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो.
डाळींब रसामध्ये फायबर विपुल प्रमाणात आढळतं. जर तुम्ही योग्य प्रमाणात तो प्यायलात, तर पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.
काही अभ्यासांनुसार, डाळींब रसाचं सेवन करण्यानं हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
डाळींब रसमध्ये पोषण तत्वे तुमच्या मेंदूला हेल्दी ठेवतात.
उच्च रक्तदाबाच्या समस्या असल्यास डाळींबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
वैज्ञानिक अभ्यासांनुसार नियमित डाळींब रस प्यायल्यानं बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते.