सुकलेली पपई खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Rakesh Mali

ऋतुमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पपई या फळाबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. पपई आरोग्याला फायदेशीर असली तरीही त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर आहे.
पपईमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन, प्रोटीन, कॅरोटीन आणि नैसर्गिक स्वरूपातील फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आपले पचनसंस्थेचे कार्य सुधारायला मदत होते.
सुकलेवी पपई खाणे लिव्हरच्या आरोग्यासाठी उत्तम असते. लिव्हरमधील पेशींचे प्रमाण समान ठेवण्यास सुकलेली पपई फायदेशीर ठरते. लिव्हरला सूज आली असल्यास सुकलेल्या पपईचे सेवन केल्यावर सूज कमी होण्यास मदत होते.
पपई आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. सुकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. सुकलेली पपई खाल्ल्याने कर्करोगासारख्या आजारांपासूनही बचाव होतो.
सुकवलेली पपई खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच सांधेदुखीसारख्या आजारांपासून सुटका होते. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर तुम्हीही सुकलेल्या पपईचे सेवन करु शकता.