व्हिटॅमिन A: RDA (Recommended Dietary Allowance) च्या 6%, फोलेट: RDA च्या 5%, व्हिटॅमिन B 5: RDA च्या 7%, व्हिटॅमिन B 12: RDA च्या 9%, व्हिटॅमिन B 2: RDA च्या 15%, फॉस्फरस: RDA च्या 9%, सेलेनिअम: RDA च्या 22% याच्या व्यतिरिक्त अंड्यामध्ये व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B 6, कॅल्शिअम आणि झिंक यांचा समावेश असतो. यासोबतच एका अंड्यामधून 77 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रथिने आणि 5 ग्रॅम फॅट्स मिळतात. या सर्व पोषकतत्वांमुळेच अंड्याला पौष्टिक आहार असे म्हटले जाते. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेली प्रत्येक पोषक गोष्ट अंड्यामध्ये असते.